Sarpanch Salary Hike : सरपंच-उपसरपंचांसाठी खुश खबर! मानधनात झाली घसघशीत वाढ, आता महिन्याला मिळणार…

Sarpanch Salary Hike : नमस्कार मंडळी,  आपल्या गावात असलेल्या सरपंच आणि उपसरपंच यांना सुद्धा सरकारकडून पगार दिला जातो. पूर्वी फक्त सरपंच यांनाच पगार मिळत होता. परंतु शासनाच्या नवीन नियमानुसार आता उपसरपंचांना सुद्धा पगार दिला जातो. तर आपल्या गावातील सरपंच आणि उपसरपंच यांना किती पगार मिळतो जाणून घेऊया आजच्या या लेखातून.

सध्या देशभरामध्ये निवडणुकीचे वातावरण दिसून येते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमुळे गावपातली वरचे वातावरण अगदी बदलून गेले आहे. परंतु आपल्याला कधी हा प्रश्न पडला आहे का ग्रामपंचायत लेव्हलला निवडणुका एवढ्या टफ का होतात? असा आपल्याला नक्कीच प्रश्न पडतो.

https://news.nokarihakkachi.com/

सरपंच-उपसरपंच यांच्या मानधनात किती वाढ झाली पहा 

त्याचे मुख्य कारण म्हणजे सरपंच आणि ग्रामपंचायत उपसरपंच यांना सुद्धा पगार मिळतो. तर यांना किती पगार मिळतो जाणून घेऊया संपूर्ण माहिती.

सरपंच व उपसरपंच यांचे मानधन होणार दुप्पट, विधानसभेच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय | Sarpanch Salary Hike

काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे त्यांनी घोषणा केली की राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच यांच्या पगारामध्ये दुपटीने वाढ Sarpanch Salary Hike केली जाणार आहे. राज्यातील सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Ladki Bahin Yojana 3rd installment : लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी.! दुसरा हप्ता या बहिणीच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात

यानुसार आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २ हजार आहे, त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं मानधन ३ हजारांवरुन ६ हजार रुपये करण्यात आले आहेत. तसेच उपसरंपचाचे मानधन १००० रुपये होते ते आता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.

२ हजार ते ८ हजारांच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचाचं मानधन ४ हजार रुपये होतं, ते आता ८ हजार रुपये करण्यात आलं आहे. तर तेथील उपसरपंचांचं मानधन १५०० रुपयांवरून तीन हजार करण्यात आलं आहे.

याबरोबरच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या ८ हजारांपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचाचं मानधन ५ हजारांवरून १० हजारांपर्यंत करण्यात आले आहे आणि उपसरपंचाचं मानधन दोन हजार रुपयांवरून आता ४ हजार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

https://news.nokarihakkachi.com/

सरपंच-उपसरपंच यांच्या मानधनात किती वाढ झाली पहा 

Scroll to Top