नमस्कार मित्रांनो, Pm internship Scheme : देशात आपण बघतोय की सध्या वेगवेगळ्या प्रकारचे योजना राबविण्यात येत आहेत. यातच आता अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४ च्या अर्थसंकल्पात कौशल्य विकास आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी पीएम इंटर्नशिप योजना सुरू केल्याची घोषणा केली होती. १२ महिन्यांसाठी भारतातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी युवकांना दिले जाईल अशी माहिती त्यावेळी देण्यात आली होती.
या ८०० कोटी रुपयांच्या पीएम इंटर्नशिप योजनेला कंपन्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ९० हजार ८४९ रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
कधी सुरु होणार रजिस्ट्रेशन?
पीएम इंटर्नशिप Pm internship Scheme योजनेसाठी 12 ऑक्टोबरपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु झाली आहे. या पायलट प्रोजेक्टमध्ये नोंदणी करण्यासाठी इच्छूक उमेदवारांना 25 ऑक्टोबरपर्यंत रजिस्ट्रेशन करावं लागेल.
उमेदवार शॉर्टलिस्ट कधी होणार
या इंटर्नशिप योजनेचे टेक्नॉलजी पार्टनर BISAG आहे. कंपनी 27 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत उमेदवार शॉर्टलिस्ट करेल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत इंटर्नशिप करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेता येईल. 2 डिसेंबरपासून सुरु होईल. ती 13 महिने असेल.
पीएम इंटर्नशिपसाठी येथून करा अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज
Pm internship Scheme : किती मिळेल इंटर्नशिप?
पीएम इंटर्नशिपसाठी Pm internship Scheme निवडण्यात आलेल्या प्रत्येक इंटर्नला 5000 रुपये मासिक भत्ता दिला जाईल. त्याचबरोबर 1 वर्ष पूर्ण झाल्यीानंतर 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम दिली जाईल. 5000 रुपयांच्या मासिक भत्त्यामधील 10 टक्के म्हणजे 500 रुपये कंपनी त्यांच्या CSR फंडातून देईल. 4500 रुपये सरकारकडून दिले जातील.
https://x.com/DDNewslive/status/1841795904652644410?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1841795904652644410%7Ctwgr%5E73128c55f1314ec82251593055a3aff59b34e794%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpmschemehub.in%2Fpminternship-mca-gov-in%2F
कुठे मिळेल इंटर्नशिप?
या पाललट प्रोजेक्टसाठी 800 कोटी बजेट असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक प्रादेशिक भाषांमध्ये इंटर्नशिप योजनेच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना शक्यतो त्यांच्या जिल्ह्यातच इंटर्नशिप दिली जाईल.
कुणाला करता येईल अर्ज?
दहावीची परीक्षा उत्तीर्ण असलेला 21 ते 24 वयोगटातील कोणत्याही तरुणाला या योजनेसाठी अर्ज करता येईल.