Gold Rate: भारतीय लोकांना सोन्याचे सर्वाधिक आकर्षण आहे. त्यामुळे देशात दरवर्षी सोन्याच्या दागिन्यांची विक्री वाढतच आहे. परंतु भारतापेक्षा स्वस्त सोने मिळणारे काही देश आहेत. त्यानुसार स्वस्त सोन्याच्या यादीत पहिला क्रमांक दुबईचा लागतो. आणखी कोणत्या देशांत सोने स्वस्त मिळते.
सोनं ही एक धातू आहे जी जगातील जवळजवळ प्रत्येक देश संचयित करू इच्छित आहे. लोक सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.
भारतात २०२४ च्या सुरुवातीलाच सोन्याने उच्चांकी पातळी ओलांडली आहे. जागतिक पातळीच्या अनुषंगाने सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. दुबईचे नाव ऐकल्यानंतरच लोक सोन्याची खरेदी करण्यापर्यंत पोहोचतात.
जगात सर्वात स्वस्त सोनं या देशात मिळतं
Bahikhata.org अनुसार दुबईमध्ये सर्वात स्वस्त सोने मिळते. सर्वात स्वस्त सोनं मिळण्याचं ठिकाण म्हणूनही दुबईची ओळख आहे. भारतातील प्रत्येक शहरात सोन्याचे भाव Gold Rate एकसारखे नसतात. देशाच्या वेगवेगळ्या सराफा बाजारात २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत वेगळी आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे राज्य सरकार आणि प्रशासनाने सोन्यावर लादलेला स्थानिक कर, जो प्रत्येक राज्यात आणि शहरात वेगळा आहे.
Gold Rate : कोणत्या देशात सोने स्वस्त आहे?
दुबईमध्ये सोने खरेदीवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. त्यामुळेच अन्य देशांपेक्षा दुबईमध्ये सोनं स्वस्त असल्याचे बोलले जाते.
दुबईनंतर हाँगकाँगमध्येही सोने खरेदीवर कोणताही Gold Rate अतिरिक्त कर लावण्यात येत नाही. त्यामुळे हाँगकाँगमध्येही सोने तुलनेने स्वस्त मिळत असल्याचे बोलले जाते.