नमस्कार मंडळी, आपण पाहतो की, सध्या अंगणवाडी सेविकांसाठी अंगणवाडी मधील मुलांचे शिक्षण आणि संगोपन सोबतच वेगवेगळ्या प्रकारची कामे देण्यात येत आहेत. जसे की मतदार नोंदणी, माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत असणारी अर्ज प्रक्रिया अशी सरकारी वेगवेगळी कामे त्यांना देण्यात येत आहेत. म्हणूनच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी, यासाठी मागण्या ह्या अंगणवाडी सेविकांकडून केल्या जात होत्या.
नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत Cabinet Decision for Anganwadi Workers अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी दिली आहे. त्यासोबतच ज्या अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांना इन्सेटिव्ह देखील मिळणार असल्याची माहिती सांगितली जात आहे.
अधिकृत माहितीसाठी ही व्हिडिओ पहा
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ | Cabinet Decision for Anganwadi Workers
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ व्हावी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे. मानधनामध्ये साधारण 50 टक्के वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. महिला मदतनीस त्यांना ३ हजार रुपये आणि अंगणवाडीसेविका यांना ५ हजार रुपये मानधन वाढवले जाणार आहे.
इन्सेटिव्ह देखील मिळणार
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ झाल्यामुळे त्यांच्यामध्ये सध्या आनंदाचे वातावरण दिसत आहे. सोबतच अंगणवाडी सेविकांनी राज्यात चालू असलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना फॉर्म भरण्यासाठी मदत केली.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या की, काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली. मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. जे ३७, ३८ अकाऊंट आहेत, ते सिल करण्यात यावे, जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरिफाय करण्यात यावे, जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
अधिकृत माहितीसाठी ही व्हिडिओ पहा
आतापर्यंत १ कोटी ८७ लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले होते, त्यांना तिन्ही महिन्यांचे पैसे आणि ज्यांना आधी २ महिन्यांचे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.