नमस्कार शेतकरी बांधवांनो, Farming Business In Marathi : आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या भारतातील बहुसंख्य लोकांचा शेती हाच व्यवसाय आहे. परंतु शेतीपासून बऱ्या प्रकारे रोजगार निर्माण होत नाहीत,त्यामुळे बरेचशे लोक शेती सोडून शहराकडे स्थलांतरित झाले आहेत. शहरामध्ये छोटा मोठा नोकरी धंदा करून आपले उदरनिर्वाह करत आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे का आपण शेतीसोबतच जोड व्यवसाय करून जास्तीत जास्त नफा मिळू शकतो. तर आज आपण अशाच प्रकारच्या तीन जोड व्यवसायांबद्दल माहिती घेणार आहोत.
Farming Business In Marathi
शेतामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवून सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. आजच्या आधुनिक युगात आपण शेती सोबतच वेगवेगळे जोडधंदे करून आपले उत्पादन आणि नफा वाढू शकतो. आपल्या शेतात होणारा अतिरिक्त खर्च कमी करून शेतकरी इतर व्यवसायात चांगला नफा कमवू शकतात. यामध्ये काही जोडधंदे आशा आहेत की ते अगदी कमी भांडवलामध्ये सुद्धा शेतकरी सुरू करू शकतात. यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सबल होईलच. त्याचबरोबर गावातील इतर लोकांना सुद्धा रोजगार मिळेल.
हे नवीन व्यवसाय करून दरमहा ३०-४० हजार सहज कमवाल
शेतकरी मित्रांनो शेतीसोबतच खालील ३ जोडधंदे आपण करू शकतो. आणि यापासून चांगले उत्पादन घेऊन योग्य नफा मिळू शकतो.
१) सेंद्रिय खत व्यवसाय-
शेतकऱ्या मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सेंद्रिय खत व्यवसाय हा शेती सोबत करणे योग्य व्यवसाय आहे. आपण पाहतो की ग्रामीण तसेच शहरी भागात सध्या सेंद्रिय शेती आणि त्यापासून उत्पादित केलेल्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. Farming Business In Marathi त्यासाठी आवश्यक असते ते सेंद्रिय खत. या वाढत्या मागणीचा विचार करून जर तुम्ही सेंद्रिय खत निर्मिती करण्याचा व्यवसाय सुरू करण्यात असाल तर हे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
२) कुक्कुटपालन –
शेतीसोबतच करण्यायोग्य दुसरा व्यवसाय आहे तो म्हणजे कुक्कुटपालन. शेतकरी मित्रांनो,आपण पाहतो की सध्या गावठी कोंबडीचे मांस आणि अंडी हे मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहेत. म्हणजेच पोल्ट्री फार्म किंवा चिकन फार्म व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर नफा कमवू शकता. स्थानिक बाजारपेठेत अंडी आणि कोंबडीला चांगला दर मिळतो आणि त्यांची मागणी वर्षातील ३६५ दिवस राहते. शासनाच्या योजनांद्वारे शेतकऱ्यांना या व्यवसायासाठी अनुदान आणि बँकेकडून स्वस्त दरात कर्ज देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. अशा परिस्थितीत कुक्कुटपालन व्यवसाय नफा मिळवू शकतो.
३) दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन –
दुग्ध व्यवसाय आणि पशुसंवर्धन हा व्यवसाय देखील शेतीसोबत करणे योग्य व्यवसाय आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. या प्रकारच्या व्यवसायात आपण पाहतो की मोठ मोठ्या कंपन्या देखील आहेत. परंतु सर्वच मोठ्या कंपन्या खेड्यापाड्यापर्यंत ग्रामीण भागात पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे दूध आणि दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा व्यवसाय करून भरपूर नफा मिळू शकतो.
शुद्ध दूध आणि दुधाचे पदार्थ पासून भरपूर नफा मिळत आहे. सुरुवातीला दहा-बारा जनावरांपासून आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. चांगल्या प्रतीच्या गाई आणि म्हैस घेऊन आपण या व्यवसायाला सुरुवात करू शकतो. यांच्या दुधाला मोठ्या प्रमाणावर मागणी असते त्यामुळे यातून भरपूर नफा मिळू शकतो. त्यासोबतच त्यांच्या शेणापासून सेंद्रिय खत निर्मिती सुद्धा होऊ शकते.
तर मित्रांनो आपण गावे राहून शेती सोबतच वरील जोड धंदे Farming Business In Marathi केले तर त्यापासून भरपूर नफा मिळवून लवकरात लवकर श्रीमंत बनवू शकता.