नमस्कार मित्रांनो, Ladki Bahin Yojana New Update: “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”अंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत. अशा २ कोटी ३० लाख पात्र महिलांच्या बँक खात्यावर आतापर्यंत ७५०० रुपये जमा सुद्धा झाले आहेत. परंतु काही कारणास्तव काही महिलांनी अजूनही या योजनेअंतर्गत फॉर्म भरलेले नाहीत. अशा महिलांसाठी शासनाने एक आनंदाची बातमी दिली आहे. या महिला अजूनही फॉर्म भरू शकतात. तर यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, की“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना”अंतर्गत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख सुरुवातीला ३१ ऑगस्ट ठेवण्यात आली होती. त्यानंतर वाढून ते ३० सप्टेंबर करण्यात आली होती. आणि मग त्यानंतर ३० सप्टेंबर नंतर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव ज्या महिलांनी अजूनही अर्ज केले नाहीत त्यांची अडचण लक्षात घेता सरकारने पुन्हा अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” Ladki Bahin Yojana New Update अंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यावर १५०० रुपये प्रति महिना असे मिळून पाच महिन्यांचे आतापर्यंत ७५०० रुपये जमा झाले आहेत. परंतु ज्या महिला अजूनही अर्ज करू शकले नाहीत त्या महिलांसाठी शासनाने आता पुढची तारीख दिली आहे. त्या महिला आता उद्यापर्यंत म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana New Update | अर्ज कुठे करावा?
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सरकारने चालू केल्यानंतर यासाठी अर्ज प्रक्रिया ही ऑनलाइन एप्लीकेशन द्वारे केली जात होती. त्यानंतर या योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले व त्यावर अर्ज प्रक्रिया सुरू केली. ७ सप्टेंबर २०२४ नंतर यामध्ये बदल करून सर्व ऑनलाईन प्रक्रिया बंद करण्यात आल्या आहेत. आता फक्त अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे अर्ज केले जाऊ शकतात.
⭕ Ration card list : गावानुसार रेशन कार्ड यादी आली, तुमच्या गावच्या रेशन कार्ड यादी तुमचे नाव तपासा.
मित्रांनो आपल्याला माहिती आहेच की “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” Ladki Bahin Yojana New Update ही शिंदे सरकारची एक यशस्वी योजना आहे. या योजनेअंतर्गत दिल्या गेलेल्या लाभांमुळे अनेक गरीब आणि होतकरू महिलांना दिलासा मिळाला आहे. अनेक महिलांना घर खर्चासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी याची मदत मिळाली आहे..