Ladki Bahin Yojana Mobile Gift : नमस्कार मित्रानो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या हफ्त्याचे पैसे जमा झाले आहेत. परंतु, लाडकी बहीण योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हफ्त्याची अनेक महिलांना प्रतिक्षा लागली आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत या योजनेचा चौथा हफ्ता दिला जाणार आहे, अशी माहिती आहे.
सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रात कोट्यावधी महिला या योजनेचा लाभ घेत आहे. कशामध्येच आता एक नवीन बातमी सोशल मीडिया वरती खूप मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.ते म्हणजे लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
या व्हिडिओच्या अंतर्गत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत मोबाईल Ladki Bahin Yojana mobile gift दिला जाणार आहे व यासाठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करायचा आहे याबाबतची माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जात आहे. मात्र प्रत्यक्षामध्ये लाखो महिला आता या स्कॅमला बळी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरच मोबाईल मिळणार का ? माहितीसाठी हा व्हिडिओ पहा
Ladki Bahin Yojana mobile gift | या लाडक्या बहिणींना दिवाळीला मिळणार मोबाईल भेट
दिवाळीसोबत निवडणुका तोंडावर असताना अजित पवार यांनी पुन्हा एकदा दोन महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याची घोषणा केली. महिलांना अॅडवान्समध्ये पैसे देण्याचीही दुसरी वेळ आहे. जुलै आणि ऑगस्टचे ३ हजार, सप्टेंबरचे १५०० आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे ३ हजार असे एकूण ७५०० रूपये निवडणुका लागेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे.
तर कोकणात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्य ग्रामीण अभियानांतर्गत कार्यरत २ हजार ४०० महिलांना मोबाईल बक्षीस Ladki Bahin Yojana mobile gift देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ज्या सरकारने तुम्हाला मोबाईल बक्षीस दिले त्या सरकारला मतांचं बक्षीस द्या, असं आवाहन उदय सामंत यांनी केलं. यानंतर विरोधकांनी उदय सामंत यांच्या घोषणेवर टीका केली.