Ladki Bahin Yojana, Fourth Installement : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्यात 4500 आणि 1500 जमा झाले आहेत. सरकारने आणखी 3000 रूपये महिलांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती. ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे मिळून सरकार महिलांच्या खात्यात 3000 जमा करणार होती. त्यानुसार हे पैसे आला महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे महिलांची आता दसरा, दिवाळी गोड होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत Ladki Bahin Yojana, Fourth Installement महत्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेतून 2 कोटी 30 लाख माझ्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा 3000 रुपयांचा हप्ता जमा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
⭕ Health Insurance Claim: आरोग्य विम्याचा क्लेम कंपन्या का नाकारतात? ‘ही’ आहेत मुख्य कारणं?
काही लोक म्हणत होते की, आचार संहितेपूर्वी या योजना बंद पाडू. आमची देण्याची वृत्ती आहे, आमचं सरकार लाडक्या बहिणींच्या मागे उभे राहणारं सरकार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
तुमच्या खात्यावर येणार का ३,००० रुपये ? असे तपासा
दरम्यान ज्या महिलांना आधी लाभ मिळाले आहेत.त्या महिलांच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 रूपये जमा होणार आहेत. त्यामुळे 10 ऑक्टोबर आधी महिलांना भाऊबीजेची ओवाळणी मिळणार आहे. ज्या महिलांना आधीच्या महिन्यांचा लाभ मिळाला नाही आहे.
त्यांना त्या महिन्याचे मिळून पैसे मिळणार आहे. आणि ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यापासून अर्ज करायला सूरूवात केली आहे. त्यांना सप्टेंबरपासून अनुक्रमे पैसे मिळणार आहे. जसे या महिलांना सप्टेंबरचा लाभ मिळाला असेल, तर त्यांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे मिळून 3000 खात्यात येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेत खोडा घालू नका
या योजनेच्या पैशातून अनेक लाडक्या बहिणांनी कुटुंबासाठी औषधे खरेदी केले, काही घरात लागणाऱ्या वस्तू देखील देखील खरेदी केल्या आहे. अनेक बहिणींनी मला देखील चिठ्ठ्या पाठवल्या आहेत. योजनेच्या माध्यमातून बहिणांच्या चेहऱ्यावर आनंद असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. लाडकी बहीण योजनेत खोडा घालू नका असं माझं दृष्ट सावत्र भावांना सांगणं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. गरिबांच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावू नका असे मुख्यमंत्री म्हणाले.